सूचना
  
Convocation Day1  Library2 Library3

शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास...



  वार्षिक २ हजार कोटी पेक्षा जास्त उलाढाल करणारी                    राज्यातील तालुका स्तरावरील एकमेव बाजार समिती.



  ग्रामिण अर्थव्यवस्थेचा कणा समजुन शेतकऱ्यांना आर्थिक                 बळकटी देणारी बाजार समिती.



  शेतकऱ्यांच्या कल्याणातच बाजार समितीचे हित....



    बळीराजाला शतश: नमन........

मा. ॲड. सुधीर कोठारी

सभापती
   


दैनंदिन बाजारभाव

संस्थे-विषयी

हिंगणघाट बाजार समितीची स्थापना १८ जानेवारी १९४० रोजी झाली असून त्यावेळेस हि समिती "कॉटन मार्केट कमेटी" ह्या नावाने ओळखल्या जात होती. पुढे १९६३ साली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा अस्तित्वात आला व त्यानंतर १९६७ पासून हि समिती कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जातआहे हिंगणघाट बाजार समितीचे पूर्वीचे कार्यक्षेत्र जुना हिंगणघाट तालुका ज्यामध्ये हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्याचा समावेश होता. शासनाने जुलै १९९८ साली हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्याचे विभाजन केले व त्यावेळेपासून ह्या समितीचे कार्यक्षेत्र फक्त हिंगणघाट तालुक्यापुरते मर्यादित आहे.

हिंगणघाट बाजार समितीने कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मुंग, तीळ, गहू, जवस, एरंडी, गुरेढोरे इत्यादी शेतमालाचे नियमन केले आहे. मात्र या बाजारपेठेत कापूस, सोयाबीन, तूर चना,गहू, ह्या शेतमालाची प्रामुख्याने अवाक आहे. हिंगणघाट बाजार समितीचे मुख्य यार्ड हे शहराचे मध्यभागी आहे. मुख्ययार्ड नझूलच्या ७ एकर जागेत उभारण्यात आले असुन येथे कापूस बाजार व गुरांचा बाजार भरत असतो. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरती समितीचे धान्य यार्ड असुन तो समितीच्या मालकीच्या २० एकर जागेमध्ये व्यापलेला आहे. सदर यार्ड छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड म्हणून ओळखला जातो. याव्यतिरिक्त समितीने वडनेर येथे ८ एकर जागेवरती तर कानगावं येथे ४ एकर जागेवर उपबाजाराची निर्मिती केली आहे.



समितीला भेटी दिलेले नामवंत मान्यवर व बाजार समिती संचालक मंडळ




  • मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवार
       कृषिमंत्री, भारत सरकार


  • मा. ना. श्री. अजितदादा पवार
          उपमुख्यमंत्री


  • मा. ना. श्री. राधाकृष्णा विखे पाटील
        कृषी व पणन मंत्री


  • मा. ना. श्री. अनिलजी देशमुख
          बांधकाम मंत्री


  • मा. ना. श्री. रंजितदादा कांबळे


  • मा. ना. श्री. सचिनजी अहिर


  • मा. ना. श्री. प्रकाशजी साळुंके
        पणन राज्य मंत्री


  • मा. ना. श्री. सुरेशभाऊ देशमुख
         मा. आमदार


  • मा. ना. श्री. शरदजी जोशी
    रा. अध्यक्ष शेतकरी संघटना


  • मा. ना. श्री. दिलीपराव काळे
    मा. सभापती कृ.उ.बा.स. मुंबई


  • मा. श्रीमती सरोजताई काशीकर
    महिला नेत्या, शेतकरी संघटना


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. अचलपूर


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स . लातूर


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. नागपूर


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. यवतमाळ


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. वरोरा


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. खामगाव


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. बारामती


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. चंद्रपूर


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. अकोला


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. अदिलाबाद


  • मा. संचालक मंडळ
    कृ.उ.बा.स. गडचिरोली